All travel stories

परत तीच शनिवारची सकाळ…

Parat Tich Shanivarchi Sakal · The Solo Ride That Refused to Stay SoloMarathi / Hindi / English
Three riders in blue raincoats on two motorcycles, stopped on a wet road below misty green hills

शनिवारची सकाळ… आणि मस्त, सुंदर सकाळी लागणारी ती झोप. बेडवरून आता उठायलाच नको, असंच वाटत होतं. खरंच, कुणाला बरं वाटत असेल प्रत्येक आठवड्याला फिरायला जायचं? मस्त गादीवर अंथरुणात पडून झोपण्यात काय मजा येते!

पण असो.

Friday ला ठरल्याप्रमाणे सकाळी ४ वाजता उठून सिंहगडला जायचा प्लॅन ठरला होता. आणि तो मी Saturday रात्री १२ वाजताच हाणून पाडला. कारण मनात एकच होतं—कुठेतरी मस्त लांब जाऊयात. सिंहगड काय, आपण सारखंच जातो.

पण सकाळी उठता-उठता १० वाजले, मग काय टांगलमांगल केली आणि कसंतरी मनाला समजावून ११ वाजता बाहेर पडलो. गाडी थेट ताम्हिणीच्या दिशेने घेतली.

जाताना हळूहळू मनात एक विचार डोकावला—

"यार, जरा अजून पुढे जाऊन कोकणातच जाऊयात की…"

म्हणजे मस्त कोकणातला पाऊस अनुभवता येईल.

पण नशिबाला काहीतरी वेगळीच planning करायची होती.

आणि जे घडलं… ते खरंच फार सुंदर होतं.

ताम्हिणीच्या रस्त्यावर…

ताम्हिणीच्या दिशेने भरधाव वेगात जात होतो. आपला तो GoPro जिवंत झाल्यामुळे मस्त फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग चालू होतं.

जाताना एका ठिकाणी बरीच लोकं थांबलेली दिसली.

मग काय, मीही गाडी side ला लावली आणि चालत पुढे गेलो—

"बघू तरी काय spot आहे."

तिकडे backwaters सारखं काहीतरी होतं. दोन couples सुद्धा दिसले. कदाचित pre-wedding shoot चालू असावा. मी scenery बघत-बघत पुढे गेलो, सगळं नीट पाहिलं आणि मस्त reel साठी videos shoot केले.

तिकडे एक Doggish भाऊसुद्धा भेटले. त्यांना hello केलं आणि मग पुढच्या वाटेला निघालो.

आणि मग… एक छोटासा waterfall!

पुढे जाताना एक छोटा waterfall दिसला.

म्हटलं, "चला, याच्या सोबत गाडीचे दोन-चार फोटो आणि videos घेऊ."

तोच तो छोटासा waterfall — आणि इथेच Bullet समोर आली.
तोच तो छोटासा waterfall — आणि इथेच Bullet समोर आली.

आणि ते फोटो काढत असतानाच झाली कमाल.

एक मुलगी सरळ Bullet वरून समोर आली.

मनात म्हटलं—

"भाईसाहब… आता मुलगी Bullet वर आहे, समोर आहे आणि आपण तिला कसं बरं ignore करणार?"

मग सहजच hello केलं.

तेव्हा कळलं की ती आणि तिची friend दोघी आल्या होत्या.

माहित नाही का, पण त्या वेळी मस्त पाऊस पडत होता. समोर एक turn होता आणि तिच्या helmet वरसुद्धा GoPro चा stand होता.

मला वाटलं, content shoot करणारी असेल.

मग सहज विचारलं, "काय, video shoot करायचा का GoPro मध्ये?"

तिथेच तिचा एक मस्त curve वर video shoot केला.

Madam ला video एकदम आवडला.

आणि मग गप्पा सुरू झाल्या.

त्या जोरदार पावसात तिला video दाखवत असताना १० वेळा phone भिजला, पण video मस्त आला होता.

गप्पांमध्ये कळलं की ते दोघीही माझ्यासारख्याच उनाड फिरत होत्या—कुठे जायचं, काय करायचं, काहीच ठरलेलं नव्हतं.

मग तिघांनी ठरवलं—

"चला, आता नुसतंच फिरायचं असेल तर सोबतच निघूया."

आणि तिथून आमचा तिघांचा प्रवास सुरू झाला.

तीन अनोळखी माणसं, एकच रस्ता — आणि तिथून ट्रिप सुरू.
तीन अनोळखी माणसं, एकच रस्ता — आणि तिथून ट्रिप सुरू.

ताम्हिणी संपली… पण प्रश्न सुरू झाला

चालत-चालत पुढे जात होतो, पण आता scenery काही दिसत नव्हती.

ताम्हिणी संपल्यावर गाडी थांबवली.

मनात आलं—

"भाईसाहब, kidhar jana hai? ताम्हिणी तो खत्म हो गया!"

तिकडे scenery चांगली होती, म्हणून जरा फोटो-video काढले.

मग पुन्हा चर्चा सुरू झाली—

"आता काय करायचं?"

त्यातल्या एकीने सांगितलं की कुणीतरी तिला सांगितलं होतं की पुढे एक मस्त waterfall आहे. ताम्हिणी संपल्यावर साधारण २ km वर right turn वर.

मग आम्ही तिकडे निघालो.

थोडं पुढे गेल्यावर Sandhan Valley ची entry दिसली.

म्हटलं, "इथे गेलो तर trek असणार आणि फार वेळ लागणार. पुढेच जाऊ, बघू काही दुसरं location दिसतंय का."

मग अजून पुढे गेलो.

आणि पोहोचलो एका अशा spot वर…

की तो spot काय होता, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.

Kundalika Valley View Point

एका side ला जंगल.

दुसऱ्या side ला खोल दरी.

आणि त्या डोंगरांवरून वाहत जाणारी, डोळ्यांचं पारणं फेडणारी ढगांची गर्दी.

ते बघून आम्ही सगळेच flat.

"आता इथेच जायचं."

गाड्या side ला लावल्या आणि जरा आत शिरलो.

तो होता Kundalika Valley चा View Point.

तिकडे ₹100 चं ticket होतं. त्या दोघींनी ticket काढलं आणि मी आपली संधी साधून आतमध्ये निघून गेलो.

"कशाला उगाच ₹100 द्यायचे? आपली मस्ती!"

पण आतमध्ये गेल्यावर जो नजारा दिसला, त्याचं शब्दांत वर्णन करणं फार कठीण होतं.

कारण बघावं तिकडे नुसते डोंगर, हिरवळ आणि त्यावरून वाहणारे ढग.

आणि दर दोन मिनिटांनी येणारा धुक्याचा पडदा…

आणि मग अचानक सगळं clear.

पुन्हा धुकं…

पुन्हा clear.

असा निसर्गाचा एकदम निराळाच खेळ चालू होता.

दर दोन मिनिटांनी धुक्याचा पडदा, आणि मग अचानक सगळं clear.
दर दोन मिनिटांनी धुक्याचा पडदा, आणि मग अचानक सगळं clear.

मी पुढे गेलो आणि valley view ला पोहोचलो.

Videos काढणं सुरू होतं, तोवर त्या दोघीही तिथे आल्या.

मग आम्ही सगळ्यांनी जरा जागेवर फेरफटका मारला, गप्पा मारल्या आणि तिथेच वेळ घालवला.

Kundalika Valley — डोंगर, हिरवळ आणि त्यावरून वाहणारे ढग.
Kundalika Valley — डोंगर, हिरवळ आणि त्यावरून वाहणारे ढग.

तेवढ्यात आमच्या rider madam ला अजून एक spot दिसला.

आणि हा spot म्हणजे…

"पाय सटकलं तर देवाघरी."

जिथे जाण्याचा मोह आवरेना…

कुणीही तिथे जात नव्हतं.

वरूनच सगळे नजारे बघत होते.

पण हिचा मोह काही आवरेना.

मी जरा दोन-चारच्या गोष्टी सांगून पाहिल्या…

पण नाही.

Madam सरळ त्या दरीच्या दिशेने खाली उतरल्या.

एकदा पाय सटकला आणि मला वाटलं—

"झालं कार्यक्रम."

पण वाचल्या.

आणि पोहोचल्या त्या कठड्याजवळ.

ते पाहून तिची friend सुद्धा खाली उतरली.

आता माझं उतरणं भागच होतं.

मग मीही उतरलो.

"यहाँ से गिरे तो सीधे भगवान से मिले" — तरी उतरलोच.
"यहाँ से गिरे तो सीधे भगवान से मिले" — तरी उतरलोच.

But that spot…

is Jannat.

जीव धोक्यात घालणं परवडेल असा तो spot होता.

पूर्ण valley चा view एकदम मस्त दिसत होता. भरपूर पाऊस, आजूबाजूचा निसर्ग आणि त्या सगळ्यातून दिसणारा तो अफाट नजारा.

आजूबाजूला कमीत कमी ५ ते १० छोटे-मोठे waterfalls दिसत होते.

खाली उतरल्यावर दिसलेला तो नजारा — म्हणूनच तो spot Jannat.
खाली उतरल्यावर दिसलेला तो नजारा — म्हणूनच तो spot Jannat.

आणि तिथे इतके फोटो आणि videos काढले की काय सांगू!

तिकडे एक couple सुद्धा आलं होतं.

ते दोघं एका छत्रीत उभे होते आणि moment एकदम romantic होता.

मी त्या मुलाला म्हटलं, "एक photo काढून देऊ? मस्त दिसताय."

पण नंतर त्या पोराने मला तब्बल २०-३० फोटो काढायला लावले.

मनात म्हटलं—

"भाऊ, तुझ्यासाठीच आलोय मी इथे!"

कसंतरी त्याला कटवून, जवळपास दोन तासांनी आम्ही त्या spot वरून निघालो.

पावसातलं ते छोटंसं जेवण…

वरती आलो तर सगळ्यांनाच भूक लागलेली.

सोबत आणलेला tiffin त्यांनी उघडला.

त्यातून निघाले मस्त चकल्या, wafers आणि garlic bread.

डोंगरावरचं ते छोटंसं जेवण — चकल्या, wafers आणि garlic bread.
डोंगरावरचं ते छोटंसं जेवण — चकल्या, wafers आणि garlic bread.

भाईसाहब…

मस्त पाऊस.

आजूबाजूला सुंदर वातावरण.

आणि त्यात ते छोटंसं-मोठंसं खाणं.

त्या moment ला तेच सगळ्यात मस्त वाटत होतं.

सगळा गोंधळ बघून जवळच्याच एका watch tower वर चढलो.

तिकडून अजून एकदा नजर फिरवली.

आणि मग final परतीला निघालो.

५ तास कधी गेले कळलंच नाही…

परतीच्या प्रवासात कुठेही थांबलो नाही.

कारण आधीच ४ वाजले होते.

सोबत घालवलेले ते ५ तास कुठे गेले, हे कळलंच नव्हतं.

मग आम्ही सुसाट पुण्याच्या दिशेने निघालो.

आयुष्यात पहिल्यांदा कुणाच्या मागे ९० km चा speed ने chase केला होता…

ते पण घाटात.

आणि शेवटी… Pirangut

Finally, Pirangut ला आल्यावर काहीतरी खाऊया असं ठरलं.

कारण घाटात अंधारात गाडी चालवायची नव्हती.

पण त्यांचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा, हे आम्हाला Pirangut च्या त्या turn वर कळलं.

तिकडेच एक café दिसलं.

मग एक pizza, fries आणि sandwich खाऊन शेवटी "Tata, bye-bye" केलं.

आणि तिथून प्रत्येक जण आपापल्या वाटेला निघाला.

शेवटी…

Finally, मी रात्री ८ वाजता घरी परतलो.

पण experience…

मस्त होता.

मनातही नव्हतं की solo सुरू केलेली ही trip अशी मस्त रंगून जाईल.

सकाळी फक्त एकट्याने निघालो होतो.

सिंहगडचा plan cancel केला.

ताम्हिणीच्या दिशेने निघालो.

कुठे जायचं, काहीच ठरलं नव्हतं.

आणि शेवटी…

नवीन friends भेटले, नवीन spots मिळाले, भरपूर photos-videos झाले आणि मस्त धम्माल झाली.

कधी कधी आपण कितीही planning केली, तरी नशिबाने केलेली planning जास्त सुंदर असते.

आणि ही trip त्यापैकीच एक होती.

कदाचित प्रवासाचं खरं सौंदर्य ठिकाणात नसतंच… तर वाटेत अचानक भेटणाऱ्या माणसांत आणि न सांगता मिळून जाणाऱ्या क्षणांत असतं.