प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट नसते, कधी आंबट, कधी गोड, कधी तिखट, तर कधी ती बेचवही असते.
गोष्ट ही कुठलीच बरोबर किंवा चूक अशी नसते — कधी थोडी साखर जास्त पडते, तर कधी कमी पडते.
कधी गोष्ट मनासारखी होते, कधी ती मनापलीकडेही जाते.
समजायचंच झालं तर — आम्ही आंब्याचा रस प्यायला गेलेलो, त्याने दूध जास्त घातलं, त्या वेळेस तो मला आवडला नाही.
पण त्याला मी म्हणालो, "अरे दादा, जरा दूध नको घालू, जरा साखर कमी घाल, आणि बर्फ खूप सारा घाल!"
मी सांगताच त्याला कळालं, कळाल्यावर त्याने ते केलं, आणि तयार झाला माझा आवडता mango juice — Shake नाही हा, Juice!
म्हणजे गोष्ट ही परफेक्ट नसते, प्रत्येक गोष्ट आवडणारी ही नसते.
पण जशी खिचडीत कमी पडलेल्या मिठाची चव, आई वरून थोडं मीठ घालून परत आणते;
जशी स्वयंपाकघरात आई, जुगाड करून, उरल्या-सुरल्या सगळ्यांचा मस्त चविष्ट पराठा बनवते —
तशाच कित्येक न आवडणाऱ्या गोष्टी, थोडं १९-२० करून, थोडं समोरच्याला सांगून, चविष्ट बनवता येतात.
म्हणून म्हणतो — प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट नसते, तिला परफेक्ट बनवायची असते.